पौड : शिवसेना पुणे जिल्हाप्रमुखपदी बाळासाहेब चांदेरे यांची निवड करण्यात आली आहे.शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई व पश्चिम महाराष्ट्र समन्व्यक रवींद्र मिर्लेकर यांनी प्रसिद्धी दिलेल्या पत्राद्वारे हि माहिती कळविली आहे.
बाळासाहेब चांदेरे यांनी मुळशी पंचायत समितीचे सभापती व उपसभापती पदावर काम केले असून २०१४ व २०१९ विधानसभेसाठी पक्षाकडे प्रमुख इच्छुक होते. त्याचप्रमाणे त्यांनी पुणे जिल्हा शिवसेना सहसंपर्क प्रमुख पदावर देखील काम केले आहे.त्यांच्याकडे असलेले संघटन कौशल्य व लोकसंपर्क याद्वारे पक्ष वाढीसाठी त्यांची निवड व्हावी,अशी कार्यकर्त्याची इच्छा होती.बाळासाहेब चांदेरे यांच्याकडे भोर- वेल्हा- मुळशी,पुरंदर - हवेली या मतदार संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हाप्रमुख पदावर त्यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना जिल्हा प्रमुखपदी निवड झाल्यानंतर बाळासाहेब चांदेरे यांनी सामना कार्यालयात जाऊन प्रबोधानकार ठाकरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व माँसाहेब यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून पदभार स्विकारला आहे.
आगामी काळात संघटना मजबूत करून पंचायत समिती व जिल्हापरिषद ,नगरपरिषद व महानगरपालिका या मध्ये शिवसेनेचा भगवा फडकावून दाखवू असे निवडीनंतर बाळासाहेब चांदेरे यांनी सांगितले.