logo
add image
add image
Blog single photo

मुलखेड गावातील काळभैरवनाथ जोगेश्वरी ग्रामविकास पॅनेलचा दणदणीत विजय


मुळशी (मुलखेड):मुळशी तालुक्यातील झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक मध्ये मुलखेड गावातील काळभैरवनाथ जोगेश्वरी ग्रामविकास पॅनेलचा दणदणीत विजय झाला.  पॅनलचे सातही उमेदवार निवडून आल्यामुळे शासनाच्या नियमाचे पालन करुन आनंद उत्सव साजरा करण्यात आला.

या पॅनेलचे प्रमुख सुखदेव तापकीर हे होते. वार्ड क्रं.1 मध्ये राहूल तापकीर 211 विरूद्ध सचिन तापकीर 144,सिमा तापकीर 205 विरूद्ध कल्याणी तापकीर 141, श्रीकांत तापकीर 199 विरूद्ध विशाल तापकीर 144 आणि वार्ड क्रं 02 मध्ये सुखदेव तापकीर 206 विरूद्ध पप्पू तापकीर 85, प्रियंका तापकीर 186 विरूद्ध पुष्पा तापकीर 106, व वार्ड क्रं 03 मध्ये करुणा तापकीर 116 विरूद्ध वंदना तापकीर 88, कविता तापकीर 112 विरूद्ध आशा कदम 92 असे मतदान झाले असून सुखदेव तापकीर यांच्या पॅनलेचा विजय झाला आहे.

यावेळी सर्व उमेदवार यांनी गावातील ग्रामस्थ यांचे आभार मानले जेष्ठ नागरिक यांचा आशिर्वाद घेतला ग्रामदेवतेच्या दर्शन घेऊन सर्व नागरिकांचे जाहीर आभार मानले आणि गावातील विकासकामांसाठी जास्तीत जास्त वेळ देऊन गावातील मुलभूत गरजा लक्षात घेऊनच काम केले जाईल असे सांगितले.

add image
add image

Leave Comments

Top