logo
add image
add image
Blog single photo

समीर मुलाणी, अरविंद कांबळे, लहू चव्हाण यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश


कोळवण येथील युवा कार्यकर्ते समीर मुलाणी व पौड येथील अरविंद कांबळे तसेच कोंढावळे येथील भाजपाचे लहू चव्हाण यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

        मुळशी तालुक्याच्या दौऱ्यावर असलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांचा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन मेळावा भुगांव येथे शनिवार ( दि.३०) रोजी पार पडला. यावेळी समीर मुलाणी व अरविंद कांबळे यांच्यासमवेत पापा मुलाणी, संजय धानके, किशोर भोसले, अमर वाघवले, राहूल सोनवणे  यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार , उपमुख्यमंत्री अजित पवार, लोकप्रिय खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुळशी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे समीर मुलाणी, अरविंद कांबळे व लहू चव्हाण यांनी सांगितले. 

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, मुळशी तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, सभापती पांडुरंग ओझरकर, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, जिल्हा नियोजनसमिती सदस्य अमित कंधारे, माजी सभापती राधिका कोंढरे, कोमल वाशिवले, रामभाऊ ठोंबरे, राजाभाऊ हगवणे,भगवान नाकती, जितेंद्र इंगवले, सतीश सुतार हे उपस्थित होते.

add image
add image

Leave Comments

Top