भुगाव : सत्तेचा वापर जनसेवेसाठी करावा तसेच पक्षाच्या माध्यमातुन नविन सदस्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले जाईल असे प्रतिपादन महासंसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी भूगाव येथे केले. मुळशी तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी सुळे बोलत होत्या.
यावेळी जि. प. उपाध्यक्ष रणजित शिवतारे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर, युवक जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, जेष्ठ नेते रामभाऊ ठोंबरे, राजाभाऊ हगवणे, सविता दगडे, सभापती पांडुरंग ओझरकर, उपसभापती विजय केदारी, जि. प. सदस्य शंकर मांडेकर, अंजली कांबळे, तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमित कंधारे, माजी सभापती कोमल वाशीवले, राधीका कोंढरे, युवकाध्यक्ष निलेश पाडाळे, सुनिल चांदेरे, निखिल मारणे, वैशाली गोपालघरे, रुपाली ढोकळे, दिलीप दगडे, अंकुश उभे, दगडुकाका करंजावणे, भाऊ केदारी, अंकुश मोरे, जितेंद्र इंगवले, विलास अमराळे, सतिश सुतार, प्रशांत रानवडे, तसेच विवीध सेलचे पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी भाजपचे कार्यकर्ते व कोंढावळे गावचे माजी सरपंच लहु चव्हाण व तालुक्यातील विवीध गावातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी पक्षामध्ये केला. यावेळी सुत्रसंचालन प्रा. संतोष गावडे यांनी केले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे यांनी केले तर आभार कार्याध्यक्ष अंकुश मोरे यांनी मानले.