पौड (ता. मुळशी) येथे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) जनसेवा कार्यालयाचे भव्य उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी त्यांनी त्यांच्या ओळखीच्या खास विनोदी शैलीत विरोधकांना टोला लगावला.
“मी ज्यांच्या सोबत जातो, त्यांची सत्ता येते. आणि ज्यांच्यासोबत जात नाही, त्यांना सत्तेच्या बाहेर राहावं लागतं. मी अनेकांना सत्तेत आणलं, पण मला सत्तेची हौस नाही,” असे वक्तव्य करून आठवले यांनी उपस्थितांत हशा पिकवला. तसेच आरपीआयचे युवा नेते विशाल भीमराव शेळके यांना पंचायत समितीत निवडून आणण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमाला भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर उपस्थित होते. ते म्हणाले, “आठवले साहेब प्रचाराला येऊ शकले नाहीत, मात्र त्यांनी माझ्यासाठी स्वतःचा व्हिडीओ संदेश पाठवला, ज्यामुळे माझ्या विजयात मोठा हातभार लागला.” पुढे ते म्हणाले की, “उरावडे येथील पोतनीस वाड्यात, जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर काही महिने वास्तव्यास होते, तिथे स्मारक उभारणीसाठी प्रयत्न सुरू आहेत. या कार्यात केंद्रीय मंत्री आठवले यांचा हातभार लागेल, अशी अपेक्षा आहे.”
कार्यक्रमात आयोजक विशाल शेळके यांच्या वतीने ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच १,००० अंध बांधवांना पांढऱ्या काठ्यांचे वितरण आणि विद्यार्थ्यांना संविधान प्रत असलेली परीक्षा पॅड वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ह.भ.प. चंद्रकांत महाराज वांजळे ,मा. शंकरभाऊ मांडेकर (आमदार, भोर-राजगड-मुळशी),मा. सूर्यकांत वाघमारे (सचिव, महाराष्ट्र प्रदेश रिपाई), मा. परशुराम वाडेकर (संघटक सचिव, महाराष्ट्र प्रदेश रिपाई), मा. शैलेश चव्हाण, (युवक अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र रिपाई),उमेश कांबळे (युवक संघटक , महाराष्ट्र प्रदेश रिपाई), मा. श्रीकांत कदम (अध्यक्ष, पुणे जिल्हा रिपाई), विजयकुमार चोबे (तहसीलदार मुळशी), संतोष गिरिगोसावी (पोलिस निरीक्षक पौड पोलिस स्टेशन),अशोक कांबळे (अध्यक्ष, मुळशी तालुका रिपाई), राजेंद्र बांदल (संस्थापक पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल) , अविनाश बलकवडे, सचिन खैरे , अमित कंधारे,लहू चव्हाण,माऊली कांबळे, चंदा केदारी, बाळासाहेब भागवत, लक्ष्मण भालेराव,,कुणाल वावळकर,विश्वनाथ जाधव, कालिदास गोपालघरे,चंद्रकांत धुराने,सुनील वाडकर,प्रवीण ओहाळ, निलेश आल्हाट, विशाल शेलार,
आकाश शेलार, गोविंद निकाळजे, विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच बहुसंख्य अंध बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश मारणे यांनी केले.