शिवकालीन पोवाडा, भारुड, लोकसंगीताचा मिलाफ असलेला महाराष्ट्राचा शाहिरी बाणा कार्यक्रम बुधवारी माले, ता.मुळशी येथे होणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या रणरागिणी नेत्या स्वाती ढमाले यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. माले येथील कृष्णा लॉन्स येथे बुधवार दि.१२ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता हा बहारदार कार्यक्रम होणार आहे. सोबतच महिला बचत गटांसाठी तसेच वैयक्तिक स्तरावर महिलांसाठी अशा वेगवेगळ्या दोन भव्य लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील ख्यातनाम युवा शाहीर चंद्रकांत माने आणि ऋतुजा माने हे कलाकार हा शाहिरी कार्यक्रम सादर करणार आहेत. अतिशय गाजलेला आणि तुफान गर्दी खेचणारा कार्यक्रम मुळशीकरांना 'याची देही याची डोळा' अनुभवता येणार आहे. महाराष्ट्राचा शाहिरी बाणा कार्यक्रम ऐकताना अंगावर शहारे येतात आणि मन शिवकाळात हरवून जाते, असे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. मुळशीकरांनी ही संधी सोडू नये असे आवाहन आयोजक शिवसेना नेत्या स्वाती ढमाले यांनी केले आहे.
सोबतच उपस्थित राहणाऱ्या महिला बचत गटांसाठी विशेष आकर्षक लकी ड्रॉ काढण्यात येणार असून, त्यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस १ लाख रुपये रोख, द्वितीय बक्षीस ५० हजार रुपये रोख व तृतीय बक्षीस २५ हजार रुपये रोख असे असणार आहे. यासाठी पौड पंचायत समिती गणातील बचत गटांनी ८६००२२०००६/७०५७२७२२२७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तर महिलांसाठी वैयक्तिक स्तरावर देखील भव्य लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. उपस्थित राहणाऱ्या महिलांची कार्यक्रम स्थळी नोंद होणार असून त्यातून लकी ड्रॉ काढला जाणार आहे. यामध्ये विजेत्या महिलेस सोन्याची नथ, चांदीचे पैंजण, चांदीच्या जोडव्या, ५ पैठणी तसेच प्रत्येक उपस्थित महिलेस आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे.
या कार्यक्रमास अनेक मान्यवर तसेच मुळशीतील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती शिवसेनेचे गणेश शिर्के यांनी दिली.