logo
add image
add image
Blog single photo

सरकारच्या राजिनाम्यासाठी भाजपचे आंदोलन


बावधन : भ्रष्ट महाविकास आघाडी सरकारच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा, मुळशी तालुका, युवा मोर्चाच्या वतीने बावधन येथे आंदोलन करण्यात आले. संघटन सरचिटणीस श्री.धर्मेंद्रजी खांडरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष नगरसेवक किरण दगडे पाटील, तालुकाध्यक्ष मुळशी विनायक ठोंबरे, तालूका उपाध्यक्ष सुनील दगडे, महिला आघाडी अध्यक्ष वैशाली सणस, युवा मोर्चा सरचिटणीस जीवन साखरे, मुळशी प्रभारी राजेशजी कुलकर्णी, प्रभाग क्र. 10 अध्यक्ष सागर कडू, युवा मोर्चाचे तेजस मारणे, राजेशजी मनगिरे, स्वीकृत सभासद विलास मोहोळ, प्रदीप जोरी, निखिल करंजावणे, प्रभाग 10 अध्यक्ष कैलास मोहोळ आदी मान्यवर उपस्थित होते.

पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर सरकारचा चेहरा जनतेसमोर आला आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे .

-नगरसेवक किरण दगडे पाटील (जिल्हाध्यक्ष, युवा मोर्चा)

add image
add image

Leave Comments

Top