logo
add image
add image
Blog single photo

बावधन बुद्रुक (ता. मुळशी) येथील क्रीडांगणासाठी हिरवा कंदील


मुळशी : बावधन बुद्रुक (ता. मुळशी) येथील क्रीडांगणासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना याबाबत योग्य ती अंमलबजावणी करून लवकरात लवकर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. 

             बावधन बु गावच्या क्रीडांगणा साठी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या आदेशाने व कार्यसम्राट आमदार संग्रामदादा थोपटे याच्या मार्गदर्शना खाली ग्रामस्थांनकडून दिलेल्या निवेदनाची अंमलबजावणी साठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज बैठक घेतली. पुढील कार्यवाहीसाठी अहवाल लवकरात लवकर करण्याच्या सुचना  प्रांतअधिकारी संदेश शिर्के यांना देण्यात आल्या आहेत

           यावेळी दिलीप दगडे, सुहास दगडे, नंदकुमार दगडे, निलेश दगडे, दिपक दगडे, बापुसाहेब दगडे, सुर्यकांत भुंडे, आझाद दगडे, अभिजीत दगडे, मंदार घुले, विशाल खिलारे, किरण भुंडे, प्रविण भुंडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


add image
add image

Leave Comments

Top