बावधन: अरिहंत एज्युकेशन फाउंडेशनचे अरिहंत कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बावधन येथे मराठी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आज एक दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन केले होते.
अरिहंत शिक्षण संस्थेचे संस्थापक मा. डॉ. संजयजी मालपाणी, संचालक मा. यशजी मालपाणी, संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक मा. डॉ. भूषण पाटील व प्राचार्य मा. डॉ. पुरुषोत्तम वडजे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विभाग प्रमुख प्रा. दुर्गा दगडे व राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. अण्णा मोहिते यांनी या चर्चासत्राचे आयोजन केले होते.
या चर्चासत्रासाठी प्रमुख वक्ते म्हणून डीसीपी वैशाली कडुकर, ॲड रुपाली पाटील/ठोंबरे, पीआय प्रणिता भाकरे/हजारे, प्रसिद्ध उद्योजिका ॲड. महुआ नारायण यांनी महिला सबलीकरण, तिचे आजचे स्थान, तिने स्वतः आत्मनिर्भर होणे किती गरजेचे आहे, वेगवेगळे कायदे या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले.