पिरंगुट, दि. २४ (वार्ताहर) - लवळे (ता. मुळशी) येथील भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील प्राध्यापिका ज्योती ढाणके यांना "गणिता यशस्वीनी अवॉर्ड-2020" याने नुकतेच गौरविण्यात आले. ॲकॅडमिक अचीव्हमेंट अवॉर्ड्स असोशियन तर्फे त्यांचा गौरव करण्यात आला.
अभियांत्रिकी क्षेत्र तसेच वास्तविक जीवनातील अडचणी आणि गणित ह्या विषयाच्या सुलभतेसाठी tracing of curves या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबीनर आयोजित करण्यात आले होते. MATLAB ह्या ऑनलाईनद्वारे करून "3 ते 4 लाइनकोड" मध्ये गणितातील तर्कशास्त्र, समीकरणे आणि अभिव्यक्ती या संकल्पनेचे स्पष्टीकरण या विषयावर एनसीईआरटी (NCERT)मध्ये प्रॅक्टिकल मॅन्युअल पुस्तक लिहिले आहे. गणित ह्या विषयाची गुंतागुंत कमी करण्याशी संबंधित यांचे एकूण 7 पेटंट प्रकाशित झाले आहेत.
त्यापैकी एक म्हणजे त्रिकोणमितीय आणि जटिल कार्येच्या मूल्यांची गणना करण्यासाठी ड्रिल बोर्ड स्लॉटेड स्केल मेकॅनिझीम आहे. पेटंट्सचे मुख्य उद्दीष्ट गणिताच्या संकल्पनेचे अनुप्रयोग अधिक सुलभ करणे आणि समजून घेणे आणि गणनाची शक्ती वाढविणे हे आहे.