पौड : चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल च्या सर्व शाखांमध्ये मराठी राज्यभाषा दिनाचे औचित्य साधून विज्ञान दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचा प्रारंभ बावधन शाखेमध्ये विज्ञान यज्ञ प्रज्वलीत करून करण्यात आला.त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून विज्ञान गीताने कार्यक्रमाची रंगत वाढली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून NCL मधील सिनिअर साइंटिस्ट मा. डॉ. रोडे सर, शिक्षक तज्ञ मार्गदर्शक मा श्री दिलीप देशमुख सर यांच्या समवेत पेरिविंकल इंग्लिश मिडियम स्कूल चे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्रजी बांदल, संस्थेच्या संचालिका सौ रेखा बांदल, एफ. एम. सी. जी. डीलर असोसिएशन पुणे जिल्हा अध्यक्ष प्रसन्न पाटील, मुळशी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन अध्यक्ष आकाश जाधव, सामाजिक कार्यकर्ते बिपीन फुले, मुख्याध्यापिका नीलिमा व्यवहारे, विभागप्रमुख रुचिरा खानवालकर, सौ निर्मल पंडित आदी मान्यवर कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित होते. तर सर्व शाखांमधील इ.8वी व 9 वी चे विद्यार्थीवर्ग आणि शिक्षकवृंद यांनी ऑनलाईन पद्धतीने झूम मीटिंग वर उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनी विज्ञान दिनाचे महत्व सांगून बझ अल्ड्रीन व नील आर्ममस्ट्रॉंग यांच्यावर आधारित न माहित असलेली सत्यकथा सांगून जीवनात एक सेकंद कसा महत्वाचा असतो हे सांगून विज्ञान दिनाचे महत्व पटवून दिले.तर संचालिका रेखा बांदल यांनी मराठी दिनावर उस्फुर्त पणे 'मराठी भाषेची श्रीमंती' कविता सादर केली.
मा श्री दिलीप देशमुख यांनी मराठी दिनाच्या शुभेच्छा देऊन वि. वा. शिरवाडकर यांच्या जीवनातील आठवणी सांगून विज्ञानामुळे जग कस पुढे गेलंय व संशोधन करणारे अधिक भारतातलेच आहेत व असेच असेल असे मत स्पष्ट केले.
तर डॉ. रोडे सरांनी एक शास्त्रज्ञ कसा घडतो व आपल्या देशाला अशा अनेक शास्त्रज्ञानची ची साथ लाभली व असे अनेक शास्त्रज्ञ जन्माला येतील असे सांगून क्षणिक पैसा कमावण्यासाठी काम करण्यापेक्षा काम करण्यात समाधान असणे महत्वाचे आहे असे सांगून विज्ञान दिवस व मराठी दिन यासारखा दुग्धशर्करा योगयाच्या शुभेच्छा देत मोलाचे मार्गदर्शन केले.
सर्व कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यपिका नीलिमा व्यवहारे विभाग प्रमुख निर्मल पंडित व रुचिरा खानवालकर यांच्या अध्यक्षतेखाली कला शिक्षिका नीता पवार व सर्व शिक्षक वृंद यांच्या सहकार्याने व मदतीने अत्यंत उत्साहात शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले.