मुळशी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी (१०) व इयत्ता बारावीच्या (१२) परीक्षेचे अंतिम वेळापत्रक (Final Timetable) जाहिर झाले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार इयत्ता बारावीची (१२) लेखी परीक्षा शुक्रवार दि.२३ एप्रिल २०२१ ते शुक्रवार दि. २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहे. तर इयत्ता दहावीची (१०) लेखी परीक्षा गुरुवार दि. २९ एप्रिल २०२१ ते गुरुवार दि. २० मे २०२१ या कालावधीत होणार आहे.
संबंधित परीक्षेचे दिनांकासह वेळापत्रक मंडळाच्या www.mahasscboard.in या संकेतस्थळावर दि. २६ फेब्रुवारी २०२१ पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.