हिंजवडी: चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या सुस शाखेमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिव जन्मोत्सव म्हणजे प्रत्येक मूला मुलांच्या मनामध्ये असलेला हा अप्रतिम सोहळा आज पेरिविंकल इंग्लिश मीडियम स्कूल सुस येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचा प्रारंभ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. राजेंद्रजी बांदल संचालिका रेखा बांदल व समन्वयिका निर्मल पंडित व पर्यवेक्षिका शिल्पा यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करुन झाली.
शिवाजी महाराजांची जीवनयात्रा ही विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाद्वारे पाळणागीता पासून ते शिवराज्याभिषेक सोहळ्या पर्यंत अत्यंत कल्पकतेने सादर केली. शिवजन्म सोहळा पाळणा गीत गाऊन साजरा झाला व नंतर शिव राज्याभिषेक सोहळा हा कार्यक्रमात मोठ्या उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाची स्फूर्ति वाढवण्यासाठी इयत्ता आठवी व नववी च्या विद्यार्थ्यानी स्फूर्ति गीत सादर केले. अंगावर शहारे आणणारे पोवाडे गायले गेले. शाळेतील इयत्ता ६ वी चे विद्यार्थी मनोरंजन प्रधान व समृद्धी पवार यांनी शिवाजी महाराजांच्या शूर कार्याबद्दल भाषण दिले.
“शिवाजी महाराजां प्रमाणेच गुरु व आईवडिलांच्या आज्ञेचे पालन करणारेच थोर इतिहास घडवू शकतता"असा संदेश संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनी त्यांच्या भाषणात विद्यार्थ्यांना दिला.
या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष श्री बांदल सर व संचालिका रेखा बांदल यांच्या अध्यक्षतेखाली सुस शाखेच्या समन्वयिका निर्मल पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका शिल्पा क्षीरसागर, शिल्पा थुल व इतर सहकारी शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मोलाचे सहकार्य मिळाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. निशा चांदेरे या विद्यार्थिनीने केले.