पौड : युवा सेना ही सघंटना शिवसेनेचा मुख्य कणा असून युवा सेनेला योग्य दिशा मिळाली तर भावी काळात खासदार, आमदार हे शिवसेनेचे असतील व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवरही भगवा फडकल्या शिवाय राहणार नाही असे मत युवा सेना राज्य विस्तारक गणेश कवडे यांनी सूस ( ता.मुळशी ) येथे व्यक्त केले.
युवा सेनेच्या नविन पदाधिकारी निवडीच्या मुलाखती वेळी शिवसेना - युवासेना पदाधिकारी व कार्यकर्त्यानां मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी शिवसेना सहसंपर्क बाळासाहेब चांदेरे, युवा सेना जिल्हाअधिकारी अविनाश बलकवडे,सचिन पासलकर, युवासेना उपजिल्हा अधिकारी बाळकृष्ण वांजळे, शिवसेना तालुका प्रमुख सचिन खैरे,उपजिल्हा प्रमुख संतोष मोहोळ, युवा सेना तालुका अधिकारी संतोष तोंडे, युवासेना कार्याध्यक्ष राम गवारे, कृषि उत्पन्न बाजार समिती सदस्य नागेश साखरे,युवासेना उपतालुका अधिकारी मयुर भांडे ,प्रतीक दगडे, समीर शिंदे,दत्ता झोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यात सरकार आणि मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्याने युवा सैनिकांनी अधिक जबाबदारीने काम करून शासनाचे लोकहिताचे निर्णय तळागाळात - लोकांपर्यंत पोहोचवावेत असे आवाहन युवासेना जिल्हा अधिकारी अविनाश बलकवडे यांनी केले.युवासेना तालुका अधिकारी संतोष तोंडे यांनी आभार मानले.