शिवसेना मुळशी तालुका प्रमुखपदी हाडशी येथील युवा कार्यकर्ते सचिन खैरे यांची नियुक्ती करण्यात आली असून मुळशी तालुक्यात शिवसेनेचा सर्वात तरूण तालुका प्रमुख होण्याचा मान त्यांना मिळाला आहे. मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांनी पञकाव्दारे हि निवड जाहिर केली आहे.
सचिन खैरे यांनी युवा सेना मुळशी तालुका प्रमुख, युवा सेना उप जिल्हा प्रमुख या पदावर काम केलेले आहे. नुकत्याच झालेल्या हाडशी ग्रामपंचायत शिवसेनेचा भगवा फडकवित त्यांनी येथे राष्ट्रवादी काँग्रेसची गेल्या कित्येक वर्षाच्या सत्तेला सुरूंग लावला आहे. सचिन खैरे यांचे वडील अनिल खैरे हे सुध्दा शिवसेना पक्षाची निष्ठेने सेवा करत आलेले असून शिवसेना तालुका प्रमुख होण्याचा मान निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांला मिळाल्याने हाडशी गावात तसेच मुळशी तालुक्यात आनंद व्यक्त केला जात आहे.
गावोगावी शिवसेनेच्या शाखा मजबूत करणार असून पुढील वर्षी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीत भगवा फडकविणार असल्याचे निवडीनंतर सचिन खैरे यांनी सांगितले.
Dnyaneshwar Bodke
तरुणांना वाव मिळणे गरजेचे होते, छान कामे होतील.अभिनंदन