logo
add image
add image
Blog single photo

मुळशीतील आदिवासी कातकरी समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी खावटी योजना राबवावी. खासदार सुप्रिया सुळेकडे अमित कंधारेची मागणी


पौड : मुळशी तालुक्यात असलेल्या आदिवासी कातकरी समाजासाठी शासनाच्या विविध योजना मिळाव्यात यासाठी आवश्यक असणारी खावटी योजना राबविण्यासाठी शासनाच्या माध्यमातून शिबिरांचे आयोजन करावे अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमित कंधारे यांनी केली आहे.

          यामध्ये मुळशी तालुक्यात आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात आदिवासी कातकरी समाजातील नागरिकांच्या वस्त्या आहेत. तालुक्यातील एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात सुमारे तीन ते पाच टक्के लोकसंख्या आदिवासी समाजाची आहे. परंतु हा समाज अद्याप मुलभूत सुविधांपासून वंचित आहे. या समाजात शिक्षणाचे प्रमाण १ टक्क्यांपेक्षाही कमि आहे. या समाजातील अनेक जणांना अद्याप घरे नाहीत. त्यांच्याकडे साधा जातीचा दाखल किंवा रेशनकार्डही नाही. या सर्व आदिवासी कातकरी समाजाला शासनाच्या विविध योजना मिळाव्यात यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी आवश्यक असणारी खावटी योजना राबविण्यासाठी सरकारच्या माध्यमातून शिबिरांचे आयोजन करावे. हि शिबीरे मुळशी तालुक्यात होण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य सागर काटकर हे सुध्दा प्रयत्नशील आहेत.

        पौड, माले, कोळवण, पिरंगुट, दासवे, मुठा व माण येथे या शिबिरांचे महसूल विभागाच्या वतीने आयोजन केल्यास सर्व लाभार्थ्यांना त्याचा योग्य लाभ मिळू शकतो.अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमित कंधारे यांनी केली असुन सदर शिबीराचे आयोजन मुळशी तालुक्यात करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबत जिल्हाधिकारी डाँ. राजेश देशमुख यांच्याशी खासदार सुप्रिया सुळे यांनी चर्चा केली.

          मुळशी तालुक्यात असलेल्या आदिवासी समाजाच्या गेल्या अनेक वर्षाच्या समस्या या शिबीरांच्या माध्यमातून सुटू शकते असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले तर एप्रिल महिन्यात मुळशी उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा करून हे शिबीर राबविण्यात येईल अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी डाँ. राजेश देशमुख यांनी दिली आहे

add image
add image
  • Blog single photo
    2021-03-06 13:28:36

    Santosh Sathe

    Nice sonavane saheb

Leave Comments

Top