logo
add image
add image
Blog single photo

मावळ - मुळशीकरांचे काम सोपे झाले हो..! प्रांत कार्यालय बावधनमध्ये आले हो...!


मुळशी:   मुळशी आणि मावळ उपविभागीय कार्यालय ( प्रांतधिकारी ) बावधन येथे बाधकाम करण्यासाठी ३,३४,००,०००/- ( तीन कोटी चौतीस लाख रूपये ) रूपयांचा निधी उपलब्ध झाला असून भोर - वेल्हा - मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नाना यश आले आहे.

        मुळशी व मावळचे उपविभागीय कार्यालयाचे कामकाज शहरातून म्हणजेच विधानभवनाच्या समोरील प्रशासकीय इमारतीतून चालायचे. मावळ व मुळशीतील नागरिकांना आपल्या कामासाठी जायचे असल्यास सर्व दिवस खर्ची करायला लागायचा. बावधन येथे उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या इमारत बांधकामास ३,३४,००,०००/- रूपये किंमतीच्या अंदाजपञकास शासन प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली असून सदर कामास सन २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून सुरूवात होणार आहे.

       मावळ व मुळशीच्या नागरिकांना जर आपले काम उपविभागीय कार्यालयात आसेल तर पुणे शहरातून वाहतूक कोंडीतून मार्ग काढत आपले काम करण्यासाठी सर्व दिवस घालवावा लागत आसे. माञ आता बावधनला हायवे लगत होणाऱ्या उपविभागीय कार्यालयामुळे सर्व मावळ व मुळशीकरांचा वेळ व पैसा बचत होणार असल्याची प्रतिक्रिया

मुळशी तालुका काँग्रेस अध्यक्ष गंगाराम मातेरे, युवक काँग्रेस अध्यक्ष सुहास भोते,युवा नेते मधुर दाभाडे यांनी दिली आहे.

add image
add image

Leave Comments

Top