logo
add image
add image
Blog single photo

पौड तहसिलदार कार्यालयास १५ कोटी रूपयांच्या निधीची आमदार संग्राम थोपटे यांची मागणी


पौड ( ता.मुळशी ) येथील तहसिलदार कार्यालय तसेच उपकोषागार कार्यालयाच्या इमारत बांधकामास १५ कोटी रूपयांच्या निधीस मान्यता मिळावी अशी मागणी भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी राज्याचे महसूल मंञी बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.

        मुळशी तालुक्यातील पौड येथे असलेले तहसिलदार कार्यालय, उपकोषागार कार्यालय ही इमारत अत्यंत जुनी तसेच जीर्ण झालेली असून महसूल कामाचा व्याप पाहता ही इमारत कामास अपूरी पडत आहे. या इमारतीच्या कामाची मागणी मुळशीकर सातत्याने करत आहेत. 

        तसेच क्रमांक २ अन्वये मा.विभागीय आयुक्त पुणे यांच्या मार्फत प्रस्ताव मा.प्रधान सचिव महसूल विभाग मुंबई यांच्याकडे सादर करण्यात आलेला असून सदर इमारतीचा समावेश अर्थसंकल्प मार्च २०२० मध्ये तांत्रिक कारणामुळे होऊ शकला नाही. तरी पौड येथे असलेल्या तहसिलदार आणि उपकोषागार कार्यालयास लवकरात लवकर  प्रशासकीय मान्यता मिळावी अशी मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी केली आहे.

add image
add image

Leave Comments

Top