पौड : पंचायत समिती मुळशी महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने मुळशी तालुक्यातील सात गावामध्ये MPSC व UPSC वाचनालयांच्या पुस्तकांचे वाटप पौड पंचायत समितीमध्ये सभापती पांडुरंग ओझरकर, गटविकास अधिकारी संदीप जठार व मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे यांच्या हस्ते करण्यात आले.या सर्व पुस्तकांची एकूण किंमत तीन लक्ष रूपये एवढी असुन MPSC व UPSC चा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
हि पुस्तके पिरंगूट येथील आदिशक्ती युवा प्रेरणा केंद्र, तुळजाभवानी मंदिर, खारावडे येथील स्व. लक्ष्मणराव मारणे सभागृह,पौड येथील स्व. सुभाषदादा शेलार सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, बाजार पेठ तसेच माण येथील डाँ.बाबासाहेब आंबेडकर भवन येथे उपलब्ध होणार आहेत. तर अजूनही इतर तीन गावामध्ये हि पुस्तके उपलब्ध होणार असून लवकरच या गावांची नावे जाहिर केली जातील.
या कार्यक्रला सभापती पांडुरंग ओझरकर, गटविकास अधिकारी संदीप जठार, उपसभापती विजय केदारी, मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, पंचायत समिती सदस्या राधिका कोंढरे,सहाय्यक गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, नांदेचे माजी सरपंच प्रशांत रानवडे,पिरंगूट ग्रामपंचायत सदस्य राहूल पवळे, पौड ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शेलार, गट शिक्षणाधिकारी बांगर, सचिन लोखंडे उपस्थित होते.
MPSC व UPSC चा अभ्यास करणाऱ्याची संख्या मुळशी तालुक्यात मोठी आहे.हि पुस्तके महाग असल्याने काही जणांना पुस्तके घेणे परवडही नाही. त्यामुळं मुळशी तालुक्यात काही गावात MPSC व UPSC ची पुस्तके उपलब्ध करून दिलेली असून याचा अभ्यास करणाऱ्नी याचा फायदा घ्यावा असे आवाहन सभापती पांडुरंग ओझरकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी केले आहे.