मुळशी : मुळशी तालुक्यातील विविध विकास कामासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार संग्राम थोपटे यांच्या डोंगरी विकास विभाग अंतर्गत हा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी दिली.
आमदार संग्राम थोपटे यांच्या डोंगरी विकास विभाग कार्यक्रम अंर्तगत सन २०२०-२१ अंर्तगत हा एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यावर मंजूर कामे मार्गी लागणार आहेत. लवकरात लवकर मंजूर कामे पूर्ण केली जातील असे आमदार संग्राम थोपटे यांनी सांगितले.
*मंजूर कामांची गावनिहाय नावे व मंजूर निधी*
दासवे सभामंडप बांधणे - ५ लाख रुपये, मुलखेड रस्ता करणे - ५ लाख रुपये, रिहे पालवेवस्ती अंर्तगत रस्ता करणे - ३ लाख रुपये, कातरखडक सभामंडप बांधणे - ५ लाख रुपये, सुसाळे जोडरस्ता व अंतर्गत रस्ता करणे - ५ लाख रुपये, खैरेवाडी अंर्तगत रस्ते करणे - ६ लाख रुपये, दखणे अंर्तगत व जोडरस्ता करणे - ५ लाख रुपये, काशिग - शेळकेवाडी सभामंडप बांधणे - ५ लाख रुपये, बार्पे - जांभुळवाडी सभामंडप बांधणे - ५ लाख रुपये, मुगावडे जोडरस्ता अंर्तगत रस्ता करणे - ५ लाख रुपये, मुठा सभामंडप बांधणे - ५ लाख रुपये, कासारसाई अंर्तगत व जोडरस्ता करणे - ६ लाख रुपये, कासारआंबोली भिलारेवस्ती जोडरस्ता व अंर्तगत रस्ता - ६ लाख रुपये, नेरे - दत्तवाडी जोडरस्ता व अंर्तगत रस्ता - ६ लाख रुपये, घोटावडे - मातेरेवाडी जोड रस्ता व अंर्तगत रस्ता - ६ लाख रुपये, होतले जोडरस्ता व अंर्तगत रस्ता - ६ लाख रुपये, मुळापूर सभामंडप बांधणे - ५ लाख रुपये, उरावडे रस्ता व अंर्तगत रस्ता करणे ६ लाख रुपये, गोणवडी सभामंडप बांधणे - ५ लाख रुपये
Tonde patil sitaram S
नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना प्रोत्साहन मिळाले.