पौड : पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल अमित कंधारे यांचा पौड ग्रामपंचायत वतीने सरपंच जगदिश लांडगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच पौड गावातील प्रलंबित कामासाठी तातडीने निधी मिळावा यासाठी निवेदनही देण्यात आले.
अमित कंधारे यांची नुकतीच पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. या अनुषंगाने पौड ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत हद्दीत पाणीपुरवठा साठवण टाकी बांधण्यासाठी ४० लक्ष रूपये तसेच भोईआळी ते पौड हायस्कूल आर.सी.सी रस्ता काँक्रीटीकरण करण्यासाठी २५ लक्ष निधी मिळावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.
यावेळी सरपंच जगदीश लांडगे, उपसरपंच रसिका जोशी, पोलिस पाटील संजय पिंगळे,कोंढावळेचे सरपंच आनंता कंधारे, ग्रामपंचायत सदस्य नंदा नवले,प्रमोद शेलार,अजय कडू, प्रशांत वाल्हेकर,प्रकाश शिंदे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष भगवान ढोरे, शामराव नवले, ग्रामसेवक विजय कदम तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
मुळशी तालुक्याची शासकीय राजधानी पौड आहे. पौडमध्ये असलेल्या समस्या प्रामुख्याने सोडविण्यात येणार असून कचरा व पाणी यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमित कंधारे यांनी यावेळी सांगितले