logo
add image
add image
Blog single photo

व्यायाम करतानाच घेतला अखेरचा श्वास


माण (ता. मुळशी) येथील राष्ट्रीय पैलवान विक्रम शिवाजीराव पारखी यांचे निधन झाले. त्यांच्या या घटनेने कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
           पै. विक्रम पारखी हे आज सकाळी व्यायामासाठी गेले होते. दरम्यान त्यांना त्रास होऊ लागला. याचवेळी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणजोत मालवली.
          विक्रम पारखी यांनी कुमार महाराष्ट्र केसरी किताब पटकावून मुळशीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला होता. वरिष्ठ महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा तसेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी प्रतिनिधित्व करत पदके मिळवली होती. तसेच अनेक कुस्ती मैदाने गाजवत मानाच्या गदा मिळवल्या होत्या.
          त्यांच्या निधनाने माण गाव व पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्र राज्यातील पैलवान, वस्ताद कुस्तीशौकिन हळहळ व्यक्त करत आहे. माजी सैनिक शिवाजीराव पारखी यांचे ते चिरंजीव तर युवा नेते बाबासाहेब पारखी यांचे बंधू होत

add image
add image

Leave Comments

Top