पौड : भोरचे महाविकासआघाडीचे उमेदवार आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या पत्नी सौ.स्वरूपाताई थोपटे यांनी पौड आणि माण येथे पदयाञा काढली.
आमदार संग्राम थोपटे हे यंदा विधानसभेसाठी चौकार मारण्याची तयारी करत आहेत. यासाठी त्यांना त्यांच्या पत्नी स्वरूपाताई थोपटे यांची मदत होत आहे.मुळशी तालुक्यातीर मोठी लोकवस्ती असलेल्या पौड आणि माण या दोन गावात स्वरूपाताई यांनी घरोघरी जाऊन आमदार संग्रामदादा याचा प्रचार केला तसेच त्यांना मतदान रूपी आशिर्वाद देऊन विजयी करण्याचे आवाहन देखील केली.
यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे समन्वयक मधुरशेठ दाभाडे,मुळशी तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा निकीता सणस,माजी महिला बालकल्याणच्या माजी अध्यक्षा लक्ष्मीताई सातपुते, युवा नेते राहूल जाधव,सविता गवारे, सरपंच सुरेखा तोंडे,निकीता रानवडे,अर्चना सुर्वे, सविता कालेकर,उर्मिला शिंदे,शिवसेना उप तालुका प्रमुख दिलीप गुरव, लक्ष्मण आप्पा ठोंबरे,पौडचे माजी सरपंच अजय कडू,भास्कर राऊत,यश पिंगळे,मयूर रानवडे तसेच महिला वर्ग उपस्थित होता.