logo
add image
add image
Blog single photo

रिंग रोडच्या मूल्यांकन समितीची जिल्ह्यातील पहिलीच बैठक मुळशीतील मातेरेवाडी येथे यशस्वी संपन्न.


पिरंगुट : पुणे (पश्चिम) चक्राकार (रिंग रोड)मार्गाकरिता जिल्हास्तरीय मुल्यांकन निश्चीती समितीने( दि ०९) रोजी ठरविलेल्या अंतिम मोबदल्यानुसार पुणे जिल्हयातील पहिली बैठक मौजे मातेरेवाडी (ता.मुळशी ) येथे आज (दि १८) रोजी खातेदारांचे संमतीपत्र व करारनामे करण्यासाठी  आयोजित करण्यात आलेली होती.

या बैठकीमध्ये जिल्हास्तरीय समितीने निर्धारित केलेला गट निहाय मोबदला संबंधीत खातेदारांना कळविण्यात आला असून त्यानुसार जिल्हास्तरीय समितीने निश्चीत केलेला मोबदला हा समाधान कारक असल्याचे मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले. बहुतांश सर्वच खातेदारांनी निश्चीत केलेल्या दराबाबत समाधान व्यक्त केले. तसेच सर्वच शेतकरी हे संमतीपत्र देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीच्या सुरुवातीला ग्रामस्थांनी समितीमध्ये असलेल्या अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे औक्षण करुन स्वागत केले. त्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले. जिल्हास्तरीय समितीने निश्चीत केलेला मोबदला हा समाधान कारक असून त्याबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी पुणे व प्रशासनाचे आभार मानले. तसेच बैठक समाप्तीच्या वेळी समाधानकारक मोबदला निश्चीत केल्याने फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

add image
add image

Leave Comments

Top