logo
add image
add image
Blog single photo

आदर्श गणेश स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळ्याचा मुहूर्त अखेर ठरला


पौड : आबासाहेब शेळके मित्र मंडळ आयोजित तालुकास्तरीय आदर्श गणेश मंडळाचा बहुप्रतीक्षित असलेला  बक्षीस वितरण सोहळ्याची तारीख अखेर निश्चित झाली असून विजेत्या मंडळांच्या निवडक कार्यकर्त्यांना लवकरच  हवाई सफरचा आनंद घेता येणार आहे.

खराब हवामान ,हेलिकॉप्टरची अनुपलब्धता ,योग्य जागा मिळणे असे  अडथळे पार करत अखेर  ११ डिसेंबर २०२२  रोजी सकाळी १० ते १ या वेळेत  विजेत्या मंडळातील कार्यकर्त्यांना हेलिकॉप्टर राईड ( मुळशी दर्शन हवाई सफर) अनुभवायला मिळणार आहे. राज्यातील पहिल्यांदाच होत असलेला हा अनोखा बक्षीस वितरण घोटावडे फाटा येथे आर्यावर्त रोडवरील प्रशस्त जागेत संपन्न होत आहे.  पहिल्या तीन क्रमांकासाठी मानकरी ठरलेल्या चार मंडळातील एकूण २४ कार्यकर्त्यांना ही हवाई सफर अनुभवयाला मिळणार आहे. विशेष कार्य करणाऱ्या एकूण २१ गुणवंत कार्यकर्त्यांचा सन्मान देखील यावेळी करण्यात येणार आहे.

यावेळी माजी मंत्री तथा शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिनजी अहिर, उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीसह तालुक्यातील विविध मान्यवर आणि तालुक्याचे  तहसीलदार अभयजी चव्हाण, गटविकास अधिकारी संदीप जठार ,पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव, नायब तहसीलदार श्रीकांत मिसाळ या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती मंडळाचे संस्थापक आबासाहेब शेळके यांनी दिली आहे.

add image
add image

Leave Comments

Top