logo
add image
add image
Blog single photo

महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या पुणे जिल्हा निवड चाचणी कुस्ती स्पर्धेचा भुकूममध्ये रंगणार थरार


पिरंगुट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त  महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या पुणे जिल्हा निवड चाचणीच्या कुस्त्यांचा आखाडा भुकूम येथे रंगणार असल्याची माहिती माजी उपसरपंच सचिन पोपटराव आंग्रे आणि सचिन बाळासाहेब हगवणे यांनी दिली. या स्पर्धेचे आयोजन समस्त ग्रामस्थ भुकूम यांनी केले आहे. स्पर्धेसाठी पुणे कोलाड हायवे लगत श्री रामेश्वर क्रीडा नगरी उभारण्यात आली असून यामध्ये भव्य पार्किंग तसेच पाच हजार प्रेक्षक बसतील एवढी मोठी आसन व्यवस्था केलेली आहे. या कुस्ती स्पर्धेची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू असून अतिशय नियोजनबद्ध कुस्त्यांचे आखाडे रंगणार आहेत. या कुस्ती स्पर्धेसाठी गावातील तरुणांनीच पुढाकार घेऊन ही स्पर्धा खेचून आणली आहे. कुस्तीचे इतिहासामध्ये पुणे जिल्ह्यात भुकूम गावच्या कुस्त्यांना विशेष महत्त्व असते आहे आणि इथून पुढेही राहणार असे मत माजी उपसरपंच पै.सचिन बाळासाहेब हगवणे यांनी व्यक्त केले.

या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक दिग्गज येणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे,खासदार संजय काकडे, आमदार संग्राम थोपटे, आमदार सचिन अहिर, आमदार विश्वजीत कदम, आमदार सुनील शेळके , माजी मंत्री बाळा भेगडे आमदार महेश लांडगे माजी आमदार अण्णासाहेब पठारे माजी आमदार विलास लांडे,आमदार दिलीप मोहिते पाटील, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी नगरसेवक दीपक मानकर  तसेच महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर येणार आहेत. यावेळी स्पर्धेच्या ठिकाणी सर्व पैलवान तसेच त्यांच्याबरोबर येणारे प्रशिक्षक यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आलेली आहे. 

स्पर्धेचे आयोजन माजी उपसरपंच सचिन पोपटराव आंग्रे सचिन बाळासाहेब हगवणे उपसरपंच अंकुश खाटपे तसेच ग्रामपंचायत सदस्य निलेश ननावरे आणि ग्रामस्थांनी केले आहे.

add image
add image

Leave Comments

Top