१८ नोव्हेंबर २०२२ रोजी बावधन खु मनपा कार्यक्षेत्रात झिका रुग्ण आढळून आला. या पार्श्वभूमीवर बावधन बु. सध्या मनपा कार्यक्षेत्रात समाविष्ट असले तरी पूर्वीच्या ग्रामीण बावधन बु. उपकेंद्राने मुळशी ग्रामीण भागात झिकाचा शिरकाव होऊ नये याकरीता खबरदारीचा उपाय म्हणून झिका, डेंग्यू, चिकुनगुनिया, मलेरिया, हत्तीरोग असे डासामार्फत प्रसार होणाऱ्या आजारांना प्रतिबंध व जलजन्य साथीचे आजारांना आळा घालण्याकरिता मुळशी तालुक्यातील आरोग्यपथकाने प्रत्यक्ष कीटकशास्त्रीय सर्वेक्षण केले.
आरोग्यपथकात आरोग्यनिरीक्षक , आरोग्यसेवक, आरोग्यसेविका व आशाकार्यकर्ती यांनी सर्वेक्षण करण्याकरिता सहभाग नोंदविला. गृहभेटी दरम्यान डासापासून होणारे आजार व त्याचा प्रतिबंध कसा करावा याबाबत सांगण्यात आले. डासोत्पत्ती स्थानके कसे नष्ट करण्यात आलीत. बांधकामाच्या ठिकाणी डासांची पैदास कशी होते तेथे अटकाव कसा करता येईल. जेथे डासोत्पती स्थानकातील पाणी काढता येत नाही अशा ठिकाणी अॅबेटचा वापर करण्यात आला.
बावधन बु. गावाच्या परिसरात आज ९३९ घरांना प्रत्यक्ष भेटी देऊन २६८४ कंटेनर तपासणी करण्यात आली. समाजात आरोग्य वृद्धिंगत होण्यासाठी आजचे प्रत्यक्ष सर्वेक्षण लाभदायी ठरेल." असा विश्वास बावधन- कोथरूड क्षेत्राचे नगरसेवक मा. श्री. किरण दगडे यांनी व्यक्त केला. तसेच प्रत्यक्ष सर्वेक्षणात कोणतीही उणीव भासणार नाही असे सर्वोतोपरी सहकार्य गुरुदेव नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक व ग्रा.पं. बावधन बु.चे माजी उपसरपंच मा. श्री. दीपक दगडे यांनी केले.
पावसाळा संपला परंतु येथे पाणी साठवून ठेवणे यामुळे डासाना अंडी घालण्याकरिता स्थानके तयार होत आहेत.बांधकामाच्या ठिकाणी स्थानके तयार होतात त्यामुळे अशा ठिकाणी पाणी साचून राहिल्याने डास तयार होतात. तयार होणाऱ्या लावा नष्ट करण्याकरिता साचलेल्या पाण्यात जळालेले ऑईल टाकावे. कंटेनरला झाकण लावावे. झाकण नसेल तर कापड बांधावे. जेणेकरून मादी डास येऊन अंडी घालणार नाही. व्हेटीलेटर पाईपला बारीक जाळी लावावी. ज्यामुळे डासापासून होणाऱ्या झिका, डेंगू, मलेरिया, हत्तीरोग अशा आजारांना आळा बसेल.
सर्वेक्षणात दुषित कंटेनर तपासणी करून नागरिकांना सजग करण्यात आले. ज्या ठिकाणी स्वच्छ तुंबलेले पाणी असेल अशा ठिकाणी गप्पी मासे व काही ठिकाणी अॅबेटचा वापर करण्यात आला.
मोफत गप्पी मासे प्रा. आ. उपकेंद्र उरावडे येथे उपलब्ध आहेत. नागरिकांनी संपर्क साधावा असे आवाहन वैद्यकीय अधिकारी मा. डॉ. रामदास ताटे यांनी केले. भंगार दुकाने, पंक्चर दुकाने, शहाळ्याची हातगाडी अथवा जेथे पाणी साचते अशा ठिकाणांना आरोग्य पथकाने भेट देऊन साथरोग होऊ नये म्हणून सवांद साधला. सहाय्यक संचालक आरोग्य सेवा पुणे येथील आरोग्यपथकाने भेट देऊन डासांची घनता व तसेच सर्वेक्षण केले. या पथकात कीटकसंहारक संदीप गोरे व राजू पौनीकर यांनी सहभाग नोंदविला.
कोणत्याही आजाराचा प्रतिबंध करावयाचा असेल तर लोकसहभाग व जनजागृती असणे महत्वाचे आहे. असे निर्देश तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वामन पी. गेंगजे यांनी दिले. शालेय जनजागृती मधून झिका आजाराविषयी विद्यार्थीना माहिती देण्यात आली. आरोग्य निरीक्षक गणेश लोणकर व नवनाथ जायभाय तसेच आरोग्य सेवक चंद्रकांत शेकडे व मेजर गजेंद्र राऊत यांनी मार्गदशन केले.