पौड : मुळशी तालुक्यात गेली पाच सहा महिने होणारी कोरोना रूग्णांची वाढ मंदावली होती.माञ मार्च महिन्यात कोरोना रूग्णाची वाढ झपाट्याने वाढली असून मुळशीकारांना पुन्हा कोरोनाचा विळखा पडला आहे.
आँक्टोबर नंतर मुळशी तालुक्यात कोरोनाचे रूग्ण सापडणे कमी झाले होते. फेब्रुवारी महिन्यात महिन्यात मुळशी तालुक्यात कोरोनाचे फक्त ३० रूग्ण सक्रीय होते. माञ मार्च महिन्यात यामध्ये झपाट्याने वाढ झाली. मुळशी तालुक्यात कोरोनाचे दररोज ५० पेक्षा जास्त रूग्ण सापडत आहे. २९ मार्च अखेर मुळशी तालुक्यात ७५० पेक्षा जास्त कोरोना रूग्ण सक्रीय असून यातील बहुतांशी रूग्ण रूग्णालयात उपचार घेत आहेत तर ञास होत नसलेल्या रूग्णांवर घरीच उपचार केले जात आहेत.
पूर्वी मुळशी तालुक्यातील औद्योगिक तसेच लोकसंख्येने मोठ्या असलेल्या गावात कोरोना रूग्ण सापडायचे माञ आता मुळशी धरण भागातही कोरोनाचे रूग्ण सापडू लागले असून यामध्ये वाढच होत आहे. मुळशी तालुक्यात कोरोना रूग्णावर उपचार करण्यासाठी हिंजवडी येथील विप्रो सध्या पूर्ण क्षमतेने रूग्ण दाखल असून लवळे येथील सिंम्बाँयसिस हाँस्पीटल, कासारआंबोली येथील सैनिकी शाळा तसेच बावधन ग्रामपंचायत अतंर्गत जिल्हा परिषद शाळा येथे चालविण्यात येत असलेले कोविड सेंटर येथेही मोठ्या संख्येने रूग्ण दाखल होऊ लागले आहे.
मुळशी तालुक्यात अनेक ठिकाणी सध्या आठवडे बाजार भरत असून येथे आखून दिलेल्या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. आठवडे बाजार गर्दी न होण्याच्या ठिकाणी हलवून व्यापाऱ्यानी जवळजवळ न बसता व्यवसाय केला पाहिजे असे मत मुळशीचे गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी व्यक्त केले आहे.
मुळशी तालुक्यात सध्या कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच नागरिकांनी झालेला आजार लपवून न ठेवता त्याच्यावर उपचार घेतले पाहिजेत. कोरोना सारखा आजार लपवून ठेवल्यास त्यांचा पहिला फटका आपल्याच कुटुंबाला बसतो. नागरिकांनी मास्क, सँनिटायझचा वापर तसेच सोशल डिस्टसिंगचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्याचे मुळशीचे सभापती पांडुरंग ओझरकर यांनी सांगितले.