पौड : मुळशी तालुक्यातील ४०० पेक्षा अधिक डाँक्टर्स व दवाखान्यातील कर्मचारी यांच्या करिता गेली दोन दिवसापासून माले येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कोरोनाची लस देण्यासाठी सुरूवात करण्यात आली आहे. याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल पुणे जिल्हा व मुळशी तालुका यांनी पुढाकार घेऊन या कामाला मदतीचा हात दिला.राष्ट्रवादी काँग्रेस डॅाक्टर्स सेल पुणे जिल्हा तर्फे मदत कक्ष तयार करण्यात आला असून प्रतिनिधी ऋषिकेश रानावडे हा या ठिकाणी काम पाहत आहे.
मुळशीचे गटविकास अधिकारी संदीप जठार, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजित कारंजकर आणि मुळशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे हे कोरोना काळात आपल्या जीवाचे रान करणाऱ्या डाँक्टर आणि दवाखान्यातील कर्मचारी यांच्या पैकी कोणीही लस घेण्यापासून वंचित राहू नये म्हणून प्रयत्नशील आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विशाल जाधव पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस डाँक्टर सरचिटणीस डॉ. महेश देसाई, मुळशी तालुका डाँक्टर सेल अध्यक्ष डॉ.समीर औटी यांच्या मार्फत सुध्दा सर्व डाँक्टर व कर्मचारी यांची नोंदणी व लस घेणेपर्यत देखरेख केली जात आहे.