भुगाव (ता.मुळशी) : येथे १५ वा वित्त आयोग निधी अंतर्गत सन २०२०/२१ मोफत नेत्र चिकित्सा दत्त चिकित्सा शुगर तपासणी ,रक्त दाब तपासणी आणि मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात ३६७ जणांची नेत्र तपासणी केली त्यांना मोफत चष्मे सुध्दा देण्यात आले. नेत्र तपासणीत १८ जणाना मोतीबिंदू आहे असे निदर्शनास आले. ३४० जणानी शुगर आणि रक्त दाब तपासणी करून घेतली.
यावेळी सरपंच निकीता रमेश सणस, उपसरपंच सतिश इंगवले,मा.उपसरपंच विशाल भिलारे सदस्य अर्चना सुर्वे,वैशाली चोंधे,पार्वती शेडगे,वैशाली सणस,सुनिता पोळ,सुरेखा शेडगे,सविता खैरे,मदन शेलार ग्रामविकास अधिकारीजमनादास इंगवले स्वस्तिक चोंधे,शंकर शेडगे दिपक करंजावणे जितेंद्र इंगवले,कैलास चोंधे,गुलाब चोंधे रमेश सणस जीवन कांबळे मुकुंद फाळके,सोपान सुर्वे,संकेत कांबळे,डॉ. चंद्रशेखर वल्हवणकर (एम डी)नेत्ररोग तज्ञ. आरोग्या सेवक राहुल तायडे आदी उपस्थित होते.