logo
add image
add image
Blog single photo

भुगाव मधील रस्त्यावरील खड्डे बुजवायला अखेर मुहूर्त सापडला


पिरंगुट : पुणे - दिघी बंदर महामार्गावर भुगांवमध्ये ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पडलेले मोठमोठे खड्डे शनिवार ( दि.२६) पहाटे रोडवेज कंपनीकडून बुजविण्यात आले असून येथील खड्डे बुजविण्यासाठी मुहूर्तच सापडला असे म्हणावे लागेल.

     मुळशी तालुक्यात मुख्य वाहतूकीसाठी व तालुक्याचे प्रवेशव्दार भुगावमध्ये गावच्या बाहेर दोन्ही बाजूने सिमेंट काँक्रीटीकरण रस्ता झालेला आहे. माञ गावातच साधारण तीनशे मीटरचा रस्ता रूंदीकरण होत नसल्याने डांबरी राहिलेला आहे. हा रस्ता सर्वच पावसामुळे उखडून त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले होता.यामुळे येथे सतत वाहतूक कोंडी होऊन वाहनचालकांन कसरत करावी लागत असायची.

       माञ ग्रामपंचायत भुगांव,विविध राजकीय पक्ष,सामाजिक संस्था व इतर नागरिकांच्या वतीने खड्डे बुजविण्यात यावेत म्हणून खासदार सुप्रिया सुळे,आमदार संग्राम थोपटे, तहसिलदार अभय चव्हाण, रस्ते विकास महामंडळ व रोडवेज कंपनीला निवेदने देण्यात आली होती. अखेर शनिवारी पहाटे रोडवेजकडून या भागातील खड्डे बुजवून काही ठिकाणी डांबरीकरणही करण्यात आले असून वाहनचालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

      पहाटे सुरू झालेले डांबरीकरणावेळी भुगावच्या सरपंच वनिता तांगडे, माजी सरपंच निकीता सणस, उपसरपंच कालीदास शेडगे, माजी उपसरपंच राहूल शेडगे,अर्चना सुर्वे,संकेत कांबळे, रमेशनाना सणस, शिवाजीआप्पा तांगडे,रोहिदास सुर्वे उपस्थित होते. .

add image
add image

Leave Comments

Top