logo
add image
add image
Blog single photo

शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या विविध नेत्यांचा मुळशीत दौरा


पिरंगुट : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे  संपर्कप्रमुख सचिन अहिर,शिवसेना उपनेते नितीन बानगुडेपाटील, उपनेत्या सुषमा अंधारे गुरूवारी (२४ नोव्हेंबर) मुळशी तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यानिमीत्त भूगाव येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याचे शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख भूगाव ग्रामपंचायतीचे सदस्य कालीदास शेडगे यांनी सांगितले. 

शेडगे यांनी गडकिल्ले बनविण्याची स्पर्धा घेतली होती. त्यातील विजेत्यांना बक्षिसे दिली जाणार आहे. यावेळी शिवसेनेच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन तसेच भूगावच्या शाखा नुतनीकरणाचा शुभारंभ होणार आहे. ज्येष्ठ शिवसैनिकांचाही यावेळी सत्कार केला जाणार आहे. तालुक्यातील इतर पक्षांचे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार असून त्यांचाही सन्मान होणार आहे. या कार्यक्रमास भोर, वेल्हा, मुळशीतील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. भूगावमधील आनंद मंगल कार्यालयात सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास अंधारे, बानगुडे, अहिर यांच्या मार्गदर्शनामुळे तालुक्यात शिवसेनेत पुन्हा नवचैतन्य निर्माण होणार आहे. त्यामुळे तालुका शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनीही या कार्यक्रमाची पूर्वतयारी केली आहे.

add image
add image

Leave Comments

Top