logo
add image
add image
Blog single photo

भुगावकरांसाठी होत असलेल्या १० लक्ष पाण्याच्या टाकीच्या कामाची पाहणी.


भुगांव ग्रामपंचायत हद्दीतील पुढील काळातील झपाट्याने वाढत असलेली लोकसंख्येची वाढ लक्षात घेऊन हे काम हाती घेण्यात आलेल्या १० लक्ष लिटर क्षमतेची आर सी सी उंच पाण्याच्या  टाकीचे काम लवकरच पूर्ण होणार असून हे टाकीचे काम पुर्ण झाल्यानंतर मातळवाडी फाटा,तांगडे वस्ती,नवनाथ मंदिर परिसर,हिरा गार्डन, गुरव वस्ती, संपूर्ण गावठाण या ठिकाणचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.

         ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी चालू असलेल्या विकास कामांची  पाहणी करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी गटनेते शांताराम इंगवले,कृषी उत्पन्न  बाजार समिती संचालक शिवाजी आप्पा तांगडे, भुगांवच्या सरपंच निकीता रमेश सणस, उपसरपंच सतिश भाऊ इंगवले, माजी उपसरपंच राहुल  शेडगे, माजी उपसरपंच दिपकआबा करंजावणे,माजी उपसरपंच कुलदीप शेडगे, माजी उपसरपंच विशाल चोंधे,माजी उपसरपंच स्वस्तिक चोंधे,माजीउपसरपंच विशाल भिलारे, मनोहर सणस, माजी तंटामुक्ती अध्यक्ष कैलास चोंधे,ग्रामपंचायत सदस्य सुरेखा शेडगे, वैशाली चोंधे, अर्चना सुर्वे, वैशाली सणस,ग्रामविकास अधिकारी मदन शेलार, कालिदास शेडगे, अमोल भिलारे, रमेश सणस, संकेत कांबळे, समीर साळुंके, दिनेश सुर्वे, मिलिंद सणस, रामदास चोंधे, नरेश चोंधे, संदिप तांगडे,नितीन तांगडे,विशाल सुर्वे,नितीन शेडगे, लालचंद भिलारे, महेश सणस, नवनाथ भिलारे,शिवाजी गावडे, रामदास चोंधे, पोपट भिलारे,सुयश चोंधे.हे उपस्थित होते. या कामाचे ठेकेदार अविनाश साईकर यांच्या कडून कामाविषयी माहिती घेतली

add image
add image

Leave Comments

Top