logo
add image
add image
Blog single photo

श्री महादुर्गामाता दौडचे पिरंगुट येथे रविवारी आयोजन


पिरंगुट : श्री शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान मुळशी तालुक्याच्या वतीने रविवार ( दि. २ आँक्टोबर ) रोजी श्री महादुर्गामाता दौडचे पिरंगुट येथे आयोजन करण्यात आले आहे.

          पिरंगुट येथे होणारी श्री महा दुर्गामाता दौड ही हिंदू समाजाच्या मना-मनात, रक्ताच्या थेंबा-थेंबात देशभक्ती धर्मभक्ती बिंबवनारी ठरेल.तालुक्याच्या विविध गावात नवराञीत नऊ दिवस दुर्गामाता दौडचे आयोजन केले जाते. माञ रविवार ( दि.२) आँक्टोबर रोजी गावातील भगिनी व  बांधव पिरंगुट येथे एकञ येणार आहेत. या दौडमध्ये तालुक्याच्या विविध भागातून २५०० जण सहभागी होण्याची शक्यता आयोजकांच्या वतीने वर्तविण्यात आली.

       यामध्ये सहभागी होताना तरूणांनी पांढरा शर्ट आणि पांढरी वारकरी टोपी परिधान करून सहभागी होऊया. रविवार ( ०२ ऑक्टोबर) रोजी पहाटे ठीक ०५:४५ पिरंगूट कॅम्प येथे एकञीकरण होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

add image
add image

Leave Comments

Top