logo
add image
add image
Blog single photo

मुळशीकरांकडुन होत आहे भुकुमकरांच कौतुक


मुळशी : पुणे जिल्हा परिषदेच्या आर. आर. पाटील सुंदर गाव पुरस्काराने भुकुम गावाचा गौरव करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुळशीतील एकूण ९५ ग्रामपंचायतींमधून २०१८-१९ मध्ये 'सुंदर गाव पुरस्कार' भुकुम गावास मिळाला आहे. दिवंगत मंत्री आर. आर. पाटील यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. दहा लाख रुपये आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. भुकुमचे तत्कालीन सरपंच नितीन बाळासाहेब कुडले, विद्यमान सरपंच रेखाताई योगेश वाघ, ग्रामसेवक यादव भाऊसाहेब यांनी हा पुरस्कार स्विकारला.                                                         यावेळी आमदार सुनील शेळके, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे,  मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, पशुसंवर्धन व कृषी सभापती बाबूराव वायकर, महिला व बालकल्याण सभापती पूजा पारगे, आदी मान्यवर उपस्थित होते.                               पुणे जिल्हा परिषदेकडून स्मार्ट ग्राम योजने अंतर्गत दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. स्थानिक प्रशासन आणि तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य यांनी गावस्तरावर राबविलेल्या विविध शासकीय योजना, नागरी सुविधा, आरोग्य, शिक्षण, कचरा, सांडपाणी, आधुनिक तंत्रज्ञान अशा विविध स्तरावर केलेल्या उल्लेखनीय कामागिरी मुळे सन 2018-19 साठीचा सुंदर गाव पुरस्कार भुकुम गावाला भेटला आहे.                 

पंधराव्या वित्त आयोगाचा निधी ग्रामपंचायतींना मोठ्या प्रमाणात मिळाला आहे. त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीचा निधीही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कसा गावाला मिळेल, हे मी पालकमंत्री या नात्याने पाहत असतो. परंतु या निधीचा विनियोग चांगल्या कामासाठी करावा.          - अजित पवार (उपमुख्यमंत्री)                 

भुकुम गाव हे शहरानजिक असल्याने लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामपंचायत स्तरावरील लोकाभिमुख विकासकामे, रस्ते, पथदिवे, आरोग्य, शिक्षण, सामाजिक दायीत्व, पर्यावरण, केंद्र आणि राज्यशासनाच्या  विवीध योजना गावामध्ये राबाविलेल्यामुळे आज हा पुरस्कार भुकुम गावाला मिळाला आहे. यांत गावातील सर्वच नागरिकांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.                                                 - नितीन कुडले (तत्कालीन सरपंच, भुकुम)

add image
add image

Leave Comments

Top