logo
add image
add image
Blog single photo

मुळशीतील गणांची आरक्षण नव्याने होणार जाहीर


पौड : मुळशी पंचायत समितीच्या आठ गणांची आज झालेल्या आरक्षण सोडतीत काही ञुटी राहिल्याने पुन्हा नव्याने आरक्षण सोडत जाहीर होणार असल्याची माहिती तहसिलदार अभय चव्हाण यांनी दिली आहे.

       आज पंचायत समितीच्या गणासाठी अनुसुचित जाती महिला : भुगांव, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : पिरंगुट 

 सर्वसाधारण महिला : कासारआंबोली, माले आणि सर्व साधारण : माण,कोळवण,कासारसाई, हिंजवडी हि गणाची आरक्षणे जाहिर झाली होती. 

       माञ आज जाहिर झालेल्या सोडतीत भुगाव गणाचे आरक्षण हे अनुसुचित जातीच्या महिलेसाठी राखीव झाले होते. गतवेळी झालेल्या या गणात अनुसुचित जाती पुरूषाचे आरक्षण पडले होते.त्यामुळे हे आरक्षण बदलणार सर्वञ चर्चा होती.

       याबाबत मुळशी तहसिलदार अभय चव्हाण यांनी सांगितले की, अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या बाबतीत निर्वाचक गणाची रचना आरक्षण निश्चिती करताना, त्यामधील लोकसंख्येचे प्रमाण आणि निकष याबाबत त्रुटी राहिल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठविण्यात आला आहेे.आरक्षण निश्चिती पुन्हा करणेसाठी तत्वतः मान्यता मिळाली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून तसे आदेश प्राप्त होताच, आरक्षण निश्चित करण्यासाठी पुनश्च सभा बोलविण्यात येईल.

add image
add image

Leave Comments

Top