पिरंगुट : पेरिविंकल स्कूलमधून देशाचा उत्तम नागरिक घडावा असे प्रतिपादन मुळशी तहसीलदार अभय चव्हाण यांनी केले. पेरिविंकल स्कूलच्या पिरंगुटमधील नूतन इमारतीचे उद्घाटन प्रसंगी अभय चव्हाण बोलत होते.
लवळे फाटा येथील पेरिविंकलच्या स्कूलचे स्वतःच्या पिरंगुटमधील सनशाईन जॉय इमारतीत स्थलांतर झाले. या नव्या वास्तूचे उद्घाटन मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण व वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांच्या हस्ते झाले.
बावधन मध्ये १५० विद्यार्थीपासून सुरू झालेली पेरिविंकलची वाटचाल ५००० विद्यार्थीं शिखररावर गेली असून मुख्य बावधनसह पिरंगुट, सूस, पौड मध्ये शाळेचा शाखा आहेत. पिरंंगुटमधील नव्या मालकीच्या वास्तूतील पेरिविंकलच्या शाळा ही सर्वाधिक वर्गखोल्या संस्थेच्या नावावर असलेली मुळशीतील एकमेव इंग्रजी माध्यमाची शाळा ठरली आहे.
याप्रसंगी सरपंच चांगदेव पवळे, माऊंट वर्ट ग्रुपचे संचालक जयंतभाई कनेरिया, चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल संचालिका रेखा बांदल, सरपंच निकीता रानवडे, मा. उपसरपंच प्रवीण कुंभार, शिवसेनेच्या जिल्हा संघटिका संगीता पवळे, ज्ञानेश्वर पवळे,अभिजीत टकले,सना ईनामदार, पुनम पांढरे, श्रावणी बांदल, यश बांदल अमित बांदल, योगेश सोनवणे, प्रदीप साठे , दिपक कंधारे,दिनेश कंधारे, मुळशी तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आकाश जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते.