logo
add image
add image
Blog single photo

मुळशी तालुक्यातील मुक्कामी एसटी बस फेऱ्या पुर्ववत करा


पौड: मागील काही काळापासून कोरोना रोगाची दूसरी लाट ओसरली आहे.त्यामुळे एसटी सेवा पुन्हा सुरू होत आहे. लांब पल्ल्याच्या बस फेऱ्या  पुर्ववत झाल्यात परंतु ग्रामीण भागातील ग्रामस्थांना मुक्कामी एसटी बस  फेऱ्यांची प्रतीक्षा कायम आहे.त्यामुळे मुळशीतील ग्रामीण भागातील  मुक्कामी एसटी बस फेऱ्या पुर्ववत सुरु करण्याची मागणी शिवसेना मुळशीच्या वतीने करण्यात आली.

     गतवर्षी कोरोना महामारीमुळे मुळशी तालुक्यातील सर्वच बस सेवा बंद करण्यात आली होती त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचा संपर्क तुटला होता.तालुक्याच्या ठिकाणी किराणा बाजारास,दवाखान्यात तसेच शहरात जाणं - येणं अशक्य झाल होतं.परंतु या काळात  पूर्ण  लॉकडाउन असल्याने शाळा, कॉलेजस बंद असल्याने लोकांनी सर्व अडचणी सहन केल्या.परंतु आता सर्व निर्बंध उठले दुसरी लाट ओसरली त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालं आहे.ग्रामीण भागातील प्रवासी, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी यांची गैरसोय टाळण्यासाठी मुळशीतील मुक्कामी एसटी बस फेऱ्या पुर्ववत करण्याची मागणीचे निवेदन शिवसेनेचे जेष्ठ नेते,भ्रष्टाचार निर्मुलन शासकीय समितीचे सदस्य नामदेव आप्पा टेमघरे यांच्या नेतृत्वाखाली पौड एसटी डेपोचे सुरेश मेंहदळे यांना देण्यात आले.यावेळी उपतालुकाप्रमुख लहू लायगुडे, विभागप्रमुख शिवाजी बलकवडे आदी पदाधिकारी आणि ग्रामीण भागातील प्रवासी उपस्थित होते.

add image
add image

Leave Comments

Top