logo
add image
add image
Blog single photo

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुळशीत भव्य मिरवणूक


पिरंगुट : मुळशीत छावा क्रांतिवीर सेना मुळशी यांच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त २५ मे रोजी पौड येथे भव्य मिरवणूक आणि जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

     पौड येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या मूर्तीचे सकाळी ९ वाजता पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे . पौड ते घोटावडे फाटा दरम्यान सायंकाळी ४ वाजता भव्य मिरवणूक होणार आहे . त्यानंतर सायंकाळी ५ वाजता आरती होणार आहे .

     यावेळी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले , खासदार सुप्रिया सुळे , आमदार संग्राम थोपटे , छावा क्रांतिवीर सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष करण गायकर , मुळशी तालुका सभापती पांडुरंग ओझरकर आणि मुळशीतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत .

        यावेळी छावा क्रांतिवीर सेना मुळशी तालुकाध्यक्ष तानाजी वाळुंज , युवकाध्यक्ष रोशन सोंडकर , सचिव विठ्ठल पवार , उपाध्यक्ष विकास खैरे ,  उपाध्यक्षा सारिका येनपुरे , कार्याध्यक्ष सुजाता ओहळे उपस्थित होते .

add image
add image

Leave Comments

Top