पौड : मानव अधिकार आणि भ्रष्टाचार निर्वारण संघटन यांच्याकडून पौड येथील डॅा.विशाल जाधव आणि कोळवण येथील डाँ. महेश देसाई यांना बालगंधर्व रंग मंदीर येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंञी रामदास आठवले यांच्या हस्ते “मानवरत्न” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच त्यांची मानव अधिकार आणि भ्रष्टाचार निवारण संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
यावेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले, माजी आमदार एल. टी. सावंत,पुण्याच्या उपमहापौर सुनिता वाडेकर,संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश केदारी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.