logo
add image
add image
Blog single photo

कासारआंबोलीच्या उपसरपंचपदी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या छाया भिलारे यांची बिनविरोध निवड


       पौड : कासारआंबोली ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी ग्रामविकास प्रतिष्ठानच्या छाया संजय भिलारे यांची बिनविरोध निवड झाली आहे. माजी उपसरपंच सुवर्णा मारणे यांनी ठरलेल्या वेळेत राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. 

         या वेळी अन्य कोणाचाही उमेदवारी अर्ज न आल्याने छाया भिलारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. छाया भिलारे या गेल्या पंचवार्षिक मध्ये देखील ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्यरत होत्या. गेल्या वेळेस सरपंचपद महिला राखीव असताना देखील त्यांना पद मिळू शकले नव्हते. चालू पंचवार्षिक मधे छाया भिलारे या बिनवीरोध सदस्य म्हणून निवडून आलेल्या आहेत.मात्र या वेळी ग्रामविकास प्रतिष्ठान, वाढेश्वर प्रतिष्ठान व श्रीमंत कासार पाटील यांच्या प्रयत्नाने उपसरपंच पदाची माळ छाया भिलारे यांच्या गळ्यात पडली आहे .

            या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष महादेव कोंढरे, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, शिवसेना नेते आबासाहेब शेळके, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष अनुपभाऊ मारणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष मोहोळ,तालुका प्रमुख सचिन खैरे, सुनिल वाडकर, ज्ञानेश्वर डफळ, प्रदीपतात्या सुतार, राजेंद्र मारणे, कांता ताई पांढरे ,मोहन शिंदे, ,अतुल सुतार, महेश मानकर ,प्रशांत गायकावाड,विनायक राऊत, पोलीस पाटील स्वाती सुतार तसेच सरपंच रणजित गायकवाड, सर्व सदस्य, जेष्ठ ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी सूत्रसंचालन गणेश भिलारे यांनी व आभार तुषार मानकर यांनी मानले.

add image
add image

Leave Comments

Top