पिरंगूट : भुकूम येथे ग्रामसचिवालयाच्या इमारतीचे भूमिपूजन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व विविध मान्यवारांच्या उपस्थितीत शनिवार ( दि.९) रोजी सकाळी ९ वाजता होणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीकडून देण्यात आली. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शेजारीच इमारत उभी राहणार असून शासनाच्या विविध योजनांमधून या इमारतीसाठी एक कोटी रुपयांचा फंड ग्रामपंचायतीने उभा केला आहे. या अतिशय सुसज्ज अत्याधुनिक सुविधा असलेल्या इमारती मध्ये सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी यांची स्वतंत्र अत्याधुनिक दालने असणार आहेत.याचप्रमाणे
तलाठी कार्यालय महावितरण पोलीस पाटील तंटामुक्ती तसेच एक एक प्रशस्त वाचनालय कॉन्फरन्स रूम अशा अनेक सुविधांसह ही नूतन वास्तू असणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीकडून देण्यात आली. संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची वास्तूंना असल्याची चर्चा सध्या सर्वत्र पसरली आहे.
जिल्हा परिषद शाळे शेजारी श्री रामेश्वर मंदिराच्या शेजारील मैदानात उद्या हा भूमिपूजन सोहळा समारंभ संपन्न होणार असल्याची माहिती उपसरपंच सचिन बाळासाहेब हगवणे आणि माजी उपसरपंच सचिन पोपटराव आंग्रे यांनी दिली.