logo
add image
add image
Blog single photo

किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोही गुन्हा दाखल करा - शिवसेना तालुकाप्रमुख सचिन खैरे


पौड : आयएनएस विक्रांतच्या नावाखाली गोळा गेलेल्या अंदाजे शंभर कोटींचा घोटाळा करून  देशाची गद्दारी करणाऱ्या देशद्रोही किरीट सोमय्या विरोधात तहसीलदार कचेरी पौड येथे निषेध करून आंदोलन करण्यात आले व किरीट सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल करून त्वरीत अटक करण्यात यावी अशी मागणी

पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या कडे निवेदनद्वारे शिवसेना मुळशी तालुक्याच्या वतीने करण्यात आली.

        यावेळी जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे,उपजिल्हाप्रमुख संतोष मोहोळ,सहसंपर्क संघटिका स्वाती ढमाले, विधानसभा संघटक प्रकाश भेगडे, युवासेना विभागीय सचिव अविनाश बलकवडे, शिवसेना नेते आबासाहेब शेळके,भ्रष्टाचार निर्मुलन सदस्य नामदेवआप्पा टेमघरे, समन्वयक कैलास मारणे, माजी तालुकाप्रमुख रविकांत धुमाळ,तालुका समन्वयक हनुमंत सुर्वे,दिलीप गुरव,विष्णू ढोरे, तालुका संघटक माऊली केमसे 

,अमित कुडले,भोर विधानसभा प्रसिध्दीप्रमुख किसन सुतार,उपतालुकाप्रमुख लहू लायगुडे, अमोल जाधव,क्रीडा अधिकारी गणेश भोईणे, विभागप्रमुख शिवाजी बलकवडे,सुहास बामगुडे, उपविभागप्रमुख रुपेश नाना जाधव,रोहिदास भायगुडे, राहुल जाधव,पांडुरंग पाडळे,गणेश कामठे लक्ष्मण पाडळे,नितीन लोयरे,मयूर रानवडे,यश पिंगळे,अमर बलकवडे उपस्थित होते.

add image
add image

Leave Comments

Top