logo
add image
add image
Blog single photo

पिरंगूट गावात मुख्य रस्त्याचे काम सुरू : मोठी वाहतूक कोंडी


पिरंगूट : पिरंगूट गावात सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्ता खूपच अरूंद झालेला असून दोन लाईनमध्ये वाहने जाऊ शकत नसल्याने येथे मोठी वाहतूक कोंडी झालेली आहे.

         पुणे कोलाड महामार्गाचे काम आधी घोटावडे फाटा ते पिरंगूट येथील पोलिस चौकी दरम्यान सुरू होते. येथे रस्ता मोठा असल्याने दोन वाहने समोरासमोर आली तरी जात होती. माञ आता पिरंगूट पोलिस चौकीजवळील ओढा ते लवळे फाटा येथील ओढा दरम्यान रस्त्याचे काम सुरू झालेले आहे. काम युध्द पातळीवर सुरू असून होत असलेल्या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला रस्ता अरूंद असून त्या पलिकडे गटार असल्याने दोन वाहने समोरासमोर पास होऊ शकत नसल्याने आज सकाळ पासूनच मोठ्या प्रमाणावर येथे वाहतूक कोंडी झालेली आहे.

       तरी पिरंगूट गावातील रस्त्याचे काम पूर्ण होई पर्यंत पुण्याहून घोटावडे फाट्याच्या पुढे येणाऱ्या व पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांनी घोटावडे फाटा - उरवडे - मुकाईवाडी ते पिरंगूट घाट खिंड रस्ता किंवा सूस मार्गे रस्त्याचा पर्यायी वापर करावा जेणे करून पिरंगूट गावातील वाहतूक कोंडी कमी होईल व आपल्या वेळेचीही बचत होईल.

add image
add image

Leave Comments

Top