पिरंगुट - मुळशी केसरी प्रतिष्ठान आयोजित मुळशी केसरी किताब स्पर्धेत मुठयाचा पृथ्वीराज मोहोळने "मुळशी किताब २०२२" मिळवला. तर नांदेचा आकाश रानवडे उपविजेता ठरला. विजेत्या पृथ्वीराजला रोख ३१ हजार, व मानाची चांदीची गदा देण्यात आली. उपविजेत्या आकाशला रोख २१ हजार व चषक देण्यात आला.
घोटावडेफाटा (ता. मुळशी) येथे मुळशी केसरी प्रतिष्ठानच्या वतीने मुळशी किताब अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यंदाचे स्पर्धेचे १६ वे वर्षे होते. स्पर्धेचे नियोजन प्रतिष्ठानचे संस्थापक भास्कर मोहोळ, अध्यक्ष बाळासाहेब आमले, कार्याध्यक्ष राजेंद्र बांदल, सचिव शरद पवार आणि प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी केले होते.
अमृता केसरी किताबाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पै. बाला रफिक शेख आणि मुंबई केसरी भारत मदने यांच्यात झाली. यात बाला रफीक शेखने अमृता किताब मिळवला. त्याला रोख रुपये आणि अमृता किताब देऊन गौरविण्यात आले.
यानिमित्त सचिन अहिर, संजय भेगडे, निलेश लंके, मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत मोकाटे, चंद्रहार पाटील, राजाभाऊ हगवणे, सुनील चांदेरे, शंकर मांडेकर, बाळासाहेब चांदेरे, महादेव कोंढरे, अमित कंधारे, रविंद्र कंधारे, आबासाहेब शेळके, सचिन खैरे, सागर साखरे, निलेश पाडाळे, नामदेव माझिरे, सुनील वाडकर, अंकुश उभे, राजाभाऊ वाघ, रमेश पवळे, अमोल शिंदे, उमेश कांबळे, राम गायकवाड, गोविंद आंग्रे, सचिन आंग्रे, मधुर दाभाडे, उमेश सुतार, नरेंद्र मारणे, राहुल शेडगे, स्वस्तिक चोंधे, पांडुरंग मराठे, सचिन हगवणे, संतोष पवळे,सागर धुमाळ , शेखर शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
गटनिहाय प्रथम चार क्रमांक विजेते पुढीलप्रमाणे
५७ किलो : अमोल वालगुडे (वेल्हा), संकेत माने (हवेली), अभिषेक शिळीमकर (भोर), किरण माने (हवेली).
६१ किलो : सचिन दाताळ (हवेली), श्रीकृष्ण राऊत (वेल्हा), रोहन उंद्रे (हवेली), सनी सणस (मुळशी).
६५ किलो : विपुल थोरात (इंदापूर), अभिषेक जाधव (मुळशी), शंतनु शेडगे (भोर), किरण शिंदे (बारामती).
७० किलो : योगेश तापकीर, करण फुलमाळी, अनुदान चव्हाण, हर्षद गोगावले (सर्व हवेली).
७४ किलो : मंगेश कोळी (हवेली), विकास शिंदे (इंदापूर), आदित्य शिंदे (हवेली), रंजित जाधव (इंदापूर)
खुला गट : पृथ्वीराज मोहोळ, आकाश रानवडे (मुळशी), अनिकेत मांगडे (हवेली), प्रतिक कदम (इंदापूर).