logo
add image
add image
Blog single photo

मंत्री छगन भुजबळ यांची मुळशी तालुक्यातील चाले येथील स्वस्त धान्य दुकानास भेट


पौड : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ हे आज पुणे जिल्ह्यातील मुळशी येथील दौऱ्यावर असतांना त्यांनी मुळशी तालुक्यातील चाले या गावातील परवानाधारक धनजंय दाभाडे यांच्या स्वस्त धान्य दुकानास अचानकपणे भेट दिली. यावेळी शासनाने आयएससो नामांकन प्राप्त करण्यासाठी ठरवून दिलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन केले जाते की नाही याबाबत पाहणी केली. 

    यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी आयएसओ नामांकन आवश्यक असलेल्या अटी व नियमांनुसार रेशन दुकानातील वजनमापे काटा, धान्यवाटप प्रमाणपत्र फलक, दरपत्रक फलक, जिल्हा दक्षता कमिटी बोर्ड, तालुका दक्षता कमिटी बोर्ड, परवाना फलक, अग्निशामक यंत्र, प्रथमोपचार कीट, व्हिजीट बुक, तक्रार पुस्तिका, ऑनलाईन विक्री रजिस्टर या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आलेली आहे की नाही याची प्रत्यक्ष पाहणी केली. या प्रत्यक्ष पाहणी दरम्यान स्वस्त धान्य दुकानदाराकडून आयएसओ नामांकन प्राप्त करण्यासाठी आवश्यक अटी व नियमांची पूर्तता करण्यात आल्याने सदर रेशन दुकानास आयएसओ प्रमाणपत्र देण्यात यावे अशा सूचना करत रेशन दुकानदार प्रामाणिकपणे सेवा करत असल्याबद्दल कौतुक करत आपले काम सुरु ठेवावे अशा सूचना दुकानदारास त्यांनी केल्या.

यावेळी दुकानातील सर्व रजिस्टरची तपासणी करण्यात आली त्याचप्रमाणे दुकानामध्ये सर्व फलक लावले पाहून भुजबळ साहेबांनी दाभाडे यांचे कौतुक केले.

उत्तम स्वच्छता , सर्व माहिती फलक, अग्निशामक यंत्र , सॅनिटायझर, प्राथमिक उपचार पेटी, पिण्याचे पाणी इ सर्व संपन्न दुकान पाहून सदरच्या दुकानाला ISO नामांकन मिळावे असा शेरा मंत्री भुजबळ साहेबांनी दिला.

     यावेळी मा सभापती रविंद्र कंधारे  ,महसूल नायब तहसीलदार सरिता पाटील , पुरवठा निरीक्षक दिपक चव्हाण , तलाठी प्रमोद आलेकर , अरूण मराठे ,सुनिल दाभाडे ,एकनाथ खोले , सुनिता दाभाडे ,संदिप नाकती मधुर दाभाडे उपस्थित होते*

add image
add image

Leave Comments

Top