पौड : नानेगांव -होतले-चाले-कुळे- दखणे विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी आशा बाळु दाभाडे यांची तर काशिनाथ कोंडु जाधव यांची व्हाइस चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
नानेगांव-होतले-चाले-कुळे- दखणे या पाच गावांची मिळून सोसायटी आहे. पाच गावातील ग्रामस्थांनी मिळून १३ संचालकांची बिनविरोध निवड केली.यानंतर दखणे येथील आशा बाळू दाभाडे यांची चेअरमनपदी तर होतले येथील काशिनाथ कोंडू जाधव यांची व्हाईस चेअरमनपदी निवड करण्यात आली.यावेळी युवा नेते मधूर दाभाडे, उद्योजक अरूण मराठे, दखणेचे माजी सरपंच सुनील दाभाडे,संतोष नाकती,एकनाथ खोले, यशवंत गायकवाड,नथू दुर्गे, वाघू दुर्गे पाटील,दिनकर दुर्गे, गणेश दहिभाते,सोपान मराठे, संदीप नाकती, सचिन दाभाडे, विजय दाभाडे तसे नानेगांव-होतले-चाले-कुळे-दखणे गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
संचालक मंडळ पुढील प्रमाणे : नाणेगाव : बाळु दगडु गायकवाड, भाऊ धोंडु पंडित, ताईबाई मारूती खेंगरे, कुळे : ज्ञानेश्वर नथु साठे,मारूती बबन साठे,होतले : विष्णू बबन दुर्गे, शंकर हरिभाऊ पवार, काशिनाथ कोंडु जाधव,चाले : जयवंत महादेव दहिभाते, रंजना अशोक दहिभाते, दखणे : राजेन्द्र सत्तु नाकती, राजीव सोमाजी दाभाडे, आशा बाळु दाभाडे