logo
add image
add image
Blog single photo

रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया मुळशी तालुक्याच्या वतीने घोटावडे फाटा येथे आंदोलन


पौड : रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया मुळशी तालुक्याच्या वतीने चांदणी चौक ते आदरवाडी या रखडलेल्या महामार्गाच्या कामाच्या विरोधात घोटावडे फाटा येथे आरपीआयचे नेते व आरपीआय पुणे जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत कदम, श्रमिक ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सतीश केदारी, तालुका अध्यक्ष गोविंद निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

        मुळशी तालुक्यातून जाणाऱ्या पुणे कोलाड महामार्गाचे काम ठेकेदार रोडवेज सोल्युशन प्राय.लिमि यांनी वेळेत पूर्ण केले नाही.त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले असून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अमित गडोख यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मुळशी तालुका रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे.तसेच मुळशी तालुक्यात प्रलंबित असलेल्या इतर रस्त्याचीही कामे ३१ मे २०२२ च्या आत पूर्ण करण्यात यावीत यासाठी एमएसआरटिसी ला निवेदन देण्यात आले. तसेच हि कामे वेळेत पूर्ण करू असे आश्वासन यावेळी एमएसआरटिसी कडून देण्यात आले.

        यावेळी पुणे जिल्हा प्रवक्ते दशरथ गायकवाड, संतोष कांबळे, के.के.लगड, उत्तम बर्वे,राहूल कदम, आनंद गायकवाड , शशिकांत चव्हाण, महेंद्र भालेराव, रवि भालेराव, गणपत कदम, पप्पू भालेराव, वंदना कदम, कैलास केदारी, सिताराम शिंदे, प्रमोद कांबळे, विशाल शिंदे उपस्थित होते.

add image
add image

Leave Comments

Top