पौड: कोंढावळे ( ता.मुळशी ) या गावाला आतापर्यंत तीन कोटीचा निधी मिळाला आहे. सरपंच कार्यक्षम असला तर निधी मिळविण्यात अडचण येत नाही.सर्वाधिक ५५ घरकूल कोंढावळे गावात मंजूर झाली. विकास कामांची गती गेल्या एक वर्षात कोरोनामुळे कमी झाली. सर्वांना पुढं घेऊन जाणे गरजेचे आहे. जिल्हा नियोजन समितीसाठी तालुक्यातून अनेक इच्छूक होते. माञ तरूण कार्यकर्त्यांला संधी देण्याच्या हेतूने अमित कंधारे यांची नियुक्ती करण्यात आली. मिळालेल्या संधीचे अमित कंधारे सोनं करतील असे प्रतिपादन मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी कोंढावळे येथे केले.
ग्रुप ग्रामपंचायत कोंढावळे - कळमशेत यांच्या वतीने पुणे जिल्हा नियोजन समितीवर युवा नेते अमित कंधारे यांची सदस्य म्हणून नेमणूक झाल्याबद्दल, कृषी उत्पन्न बाजार समितीवर नवनियुक्त झालेले संचालक, नवीन निवड झालेल्या विविध गावचे सरपंच - उपसरपंच यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते तसेच कोंढावळे - कळमशेत येथील विविध विकासकामांचे भुमिपूजन तसेच उदघाटन सोहळा यावेळी पार पडला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, उपसभापती विजय केदारी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, दूध उत्पादक संघाच्या उपाध्यक्षा वैशाली गोपालघरे, महिला राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षा चंदा केदारी, विधानसभा अध्यक्ष सुनिल चांदेरे, कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक दगडूकाका करंजावणे, भगवान नाकती, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष अंकुश मोरे, युवक अध्यक्ष निलेश पाडाळे, भाऊ केदारी, योगेश ठोंबरे, गण अध्यक्ष विजय येनपूरे, शरद शेंडे, लहू चव्हाण,गणेश वाशिवले,माजी उपसरपंच विनोद कंधारे,चेतन फाले, कोंढावळेचे सरपंच आनंता कंधारे,उपसरपंच अशोक जोरी, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र कंधारे, सोमनाथ येनपुरे, रचना कंधारे, स्वाती पवार, सिताबाई शिर्के,राधाबाई जाधव, शांताराम शिर्के, रामाआप्पा कंधारे,विजय भालेराव, दिपक सोनवणे,प्रकाश सोनवणे,सर्जेराव सोनवणे, निलेश धनावडे, शांताराम पवार,नथू आप्पा कंधारे, राम कंधारे, बंडू वाटाणे ग्रामसेवक अडसुळ तसेच कोंढावळे - बेलावडे पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुञसंचलन रवि शिंदे यांनी केले.
जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर यावेळी म्हणाले की कार्यकर्त्यांना ताकद देण्याची गरज आहे. पाठव पुरवा केलेल्या कामाला प्राधान्य मिळाले पाहिजे. चुकीच काम न करता जास्तीत जास्त निधी मिळाला पाहिजे.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे यावेळी म्हणाल्या की, सरपंचाला शासनाने जास्त अधिकार दिलेला आहे. निवडून आल्यानंतर सरपंच - उपसरपंच यांनी चांगले काम केले पाहिजे. अमित कंधारे यांनी केलेल्या चांगल्या कामाची पावती त्यांना मिळाली आहे. तालुक्याचे नेतृत्व करताना संपूर्ण तालुक्याचा विचार करून जिल्हा नियोजन समिती मधून मुळशी तालुक्याला जास्तीत जास्त निधी आणावा. आपल्या गावात चांगली कामे करण्यासाठी सरपंचानी जिल्हा परिषद व पंचायत समितीचा पाठपुरावा करावा.
भोर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनिल चांदेरे यावेळी म्हणाले की ,अमित कंधारे यांनी वडील नसतानाही स्वकर्तत्वावर व्यवसाय उभा केला.कमी वयात राजकारणात उडी घेतली. ग्रामपंचायतीला सरपंच म्हणून चांगले काम केले. विधानसभा, लोकसभा व अखिल भारतीय संघटनेवर काम करण्याची त्यांना संधी मिळाली. तीन तालुक्याच पद अमित कंधारे यांच्या रूपाने मुळशीला मिळाले असून तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी यासाठी महत्त्वाची भुमिका बजावली आहे.
गावाने मला खूप प्रेम दिले. जिल्हा नियोजन समितीवर काम करण्याची संधी मिळाली. राजकारण करत असताना आयुष्यात चढउतार आले. काही जणांनी जाणीवपूर्वक संपविण्याचे प्रयत्न केले. तालुका स्तरावर अनेक प्रश्न आहेत. मुळशी धरणग्रस्ताच्या असलेल्या अडचणी सोडविणार असून मुख्य रस्ता, कचरा समस्या तसेच तालुक्यातील चार किल्ल्याचा विकास करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
-अमित कंधारे (सदस्य जिल्हा नियोजन समिती)