logo
add image
add image
Blog single photo

म्हसवेश्वर सोसायटीच्या चेअरमनपदी वृंदा दिनेश येनपुरे यांची बिनविरोध निवड.


  खारावडे : मुठा खोय्रातील म्हसवेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी च्या चेअरमन पदी वांजळे येथील सरपंच वृंदा दिनेश येनपुरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या सोसायटीवर पहिली महिला चेअरमन महिला होण्याचा मान हा येनपुरे घराला मिळाला आहे. तसेच व्हाईस चेअरमनपदी पदी संतोष यशवंत कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

             या सोसायटीची सभासद संख्या १६३२ आहे. तालुक्यातील सर्वात मोठी सोसायटी म्हणुन या सोसायटीची ओळख आहे. सोसायटी येथील ग्रामस्थांनी एकाच बैठकीत बिनविरोध केल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांची एकजूटी तालुक्यात दिसुन आली.

         तसेच संचालक म्हणुन रामभाऊ मारणे, शंकर मारणे, मारुती कानगुडे, नथु मारणे, बाळासाहेब उभे, महादेव मरगळे, अशोक चवले, मधुरा भेलके, लक्ष्मण शिंदे, कैलास मारणे, मोहन झुजूंरके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. 

         निवडच्या वेळी मध्ये पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक अंकुश उभे, काँग्रेस नेते संजय उभे, शिवसेना युवा नेते दिनेश येनपुरे, वातुंडे गावचे सरपंच अमोल शिंदे, सुरेश मारणे, दत्ता उभे, प्राध्यापक शिवाजी चवले, सरपंच लक्ष्मण मारणे, प्रफुल्ल मारणे, मिंनाथ कानगुडे,  उपसरपंच रवींद शिंदे,पोलिस पाटील रामदास मानकर,भाऊ मरगळे, शिवाजी उभे,  एकनाथ येनपुरे, माऊली साळेकर, शाम येनपुरे, युवा उद्योजक मयुर उभे, तुषार उभे , सुनिल मरगळे तसेच मुठा भागातील ग्रामस्थ उपस्थित होते.निवडणूक अधिकारी म्हणून म.म.नरुटे तसेच सेक्रेटरी आनंद कुडले यांनी काम पाहिले.


add image
add image

Leave Comments

Top